किहीममध्ये रंगणार भजने

। अलिबाग । प्रतिनिधी ।

अलिबाग तालुक्यातील किहीम-भंडारआळी येथे काळभैरव मंदिराच्या जीर्णोध्दार सोहोळ्यानिमित्त भजनांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. बुधवारी सायंकाळपासून ते शुक्रवारी रात्रीपर्यंत वेगवेगळ्या भजनांचा आनंद घेता येणार आहे.

बुधवारी (दि.11) सायंकाळी कामथ येथील श्री हनुमान प्रासादिक बालमित्र भजन मंडळ, श्रीकाळभैरव प्रासादिक भजन मंडळ, श्री गजानन प्रासादिक भजन मंडळ, श्री चामुंडा देवी प्रासादिक भजन मंडळ, श्री वेताळेश्‍वर प्रासादिक भजन मंडळ, ब्राह्मणआळीमधील एकादशी भजन मंडळ यांचे भजन होणार आहे. गुरुवारी (दि.12) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास आवासमधील पाठक आळी येथील श्री सिध्देश्‍वर प्रासादिक भजन मंडळ, नगरमधील भक्ती संगीत प्रासादिक भजन मंडळाची भजने होणार आहेत. शुक्रवारी (दि.13) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास आनंद गंधर्व, आनंद भाटे, कल्याणी जोगळेकर यांचा आनंदगायनाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

Exit mobile version