भालचंद्र पाटील यांचे निधन

| खरोशी | वार्ताहर |

ओढांगी गावचे प्रसिध्द राष्ट्रीय कबड्डीपट्टू भालचंद्र जनार्दन पाटील, यांचे नुकतेच अल्पश: आजाराने निधन झाले. 1985 ते 95 या दशकात फतलाल इंजिनइरींग या कंपनीतुन व्यवसायिक कबड्डीपट्टू म्हणून त्यांनी उज्ज्वल यश संपादित केले होते. त्यांची सलग सहा वेळा ठाणे जिल्हा संघातून त्यांची निवड झाली होती. महाराष्ट्राच्या संघातून राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा खेळण्याचा बहूमान त्यांनी मिळवला होता. त्यांनी 1985 ते 95 या काळात ठाणे व रायगड जिल्हयातील अनेक कबड्डीच्या मैदानात नेत्रदिपक कामगिरी करुन कबड्डी रसिकांच्या मनावर राज्य केले होते. अनेक वर्ष ते वायुसुत क्रीडामंडळ ओढांगी पेण या मंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांनी किरण पाटील, सुभाष पाटील, मुरलीधर पाटील यासारखे कबड्डीपट्टू त्यांनी घडविले. अशा या कबड्डीक्षेत्रात अलैकिक कामगिरी करणार्‍या यांच्या जाण्याने ओढांगी पेण कबड्डी संघात कधीही भरुन न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या अंत्यदर्शनास सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version