भामट्या सर्व्हेअर लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

दीड लाखाची लाच घेताना पकडले
। नेरळ । वार्ताहर ।
लाच प्रकरणात अटक होण्याचा सरकारी अधिकाऱ्यांचा कर्जत तालुक्याला लागलेला काळिमा काही पुसण्याचे नाव घेत नाही. शासकीय सर्व्हेअर असल्याचे भासवून जमीन मोजणीयासाठी आलेल्या शेतकऱ्यांना नांदणाऱ्या भूमी अभिलेख कार्यालयाशी संबंधित आणखी एकाला लाच घेतला लाचलुचपत विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. कर्जत येथे भूमिअभिलेख कार्यालयात काम करीत असून तसे भासवून शेतकऱ्यांच्या मोजणीसाठी अवाच्या सव्वा रक्कमेची मागणी करणाऱ्या बनावट सर्वेअरला ठाणे लाचलुचपत विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. विजय राम ठाकरे असे खासगी सर्वेअर याचे नाव तो भूमिअभिलेख कार्यालयाच्या आदेशावरूनच जमीन मोजणीची कामे करीत होता आणि त्या कार्यालयाशी संबंधित अन्य काही देखील आपण शासकीय सर्व्हेअर असल्याचे भासवत असतात.

कर्जत तालुक्यातील धोत्रे गाव येथे वेगिथ ग्लोबल सव्हीसेस या कंपनीची जमीन आहे.२०२१ मध्ये खरेदी केलेल्या सर्वे क्र. ८३१ – १०० मधील बिनशेती जमिनीमधील भूखंडांची मोजणी करण्यासाठी संबंधित कंपनीकडून कर्जत येथील भूमिअभिलेख कार्यालयात अर्ज करण्यात आला होता.संबंनधत जमिनीचे अलिबाग रायगड येथील नगररचना कार्यालयाकडून अकृषिक दाखला येण्यासाठी कर्जत येथील भूमिअभिल्लेख कार्यालयाकडून जमिनीची मोजणी करणे आवश्यक असते. त्यासाठी अर्ज दाखल केल्यानंतर संबंधित कंपनीच्या अधिकार्यांबरोबर कर्जत भूमिअभिलेख कार्यालयाकडून विजय राम ठाकरे हा तरुण उपस्थित होता. आपण शासकीय सर्व्हेअर असून जमिनीचे भूखंड पाडण्यासाठी करावी लागणारी जमीन मोजणी आपण करू आणि त्यासाठी तीन लाख रुएए खर्च येईल असे ठाकरे याने सांगितले.त्यानंतर मोजणीची तारीख देण्यासाठी संबंधित कम्पनीचे अधिकारी यांनी विजय ठाकरे या तथाकथित सर्व्हेअर याची भेट घेतली असता आधी दीड लाख आणि मोजणी झाल्यावर दीड लाख देणायचे ठरले. त्या दोघात ठरल्यानुसार मोजणीची तारीख घेण्यासाठी १४ डिसेंबर रोजी येताना पहिला हप्ता डिड लाख रुपये घेऊन भुमी अभिलेख कार्यालय कर्जत येथे बोलाविले बाबत तक्रार प्राप्त झाली.

याबाबत वेगिथ ग्लोबल सव्हीसेसचे अधिकारी यांनी ठाणे येथील लाचलुचपत विभागाशी संपर्क साधला. सदर तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक १४/१२/२०२२ रोजी पडताळणी केली असता नमुद खाजगी सर्व्हेअर विजय ठाकरे याने तक्रारदार यांना आपण स्वतः कर्जत भूमिअभिलेख कार्यालयातील शासकीय सर्व्हेअर असल्याचे भासवुन मोजणीची तारीख देण्याकरीता दीड लाख रुपयाची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने.सापळयाचे आयोजन केले. त्यावेळी सायंकाळी साडे पाच वाजता लावण्यात आलेल्या ट्रॅप प्रसंगी खाजगी इसम विजय राम ठाकरे यांना तक्रारदार यांचेकडुन एक लाख रुपयांची लाचेची रक्कम स्विकारताना रंगेहात पकडण्यात आले.सदर गुंत्यात ठाणे लाचलुचपत विभागाचचे अधीक्षक सुनील लोखंडे आणि अप्पर अधीक्षक अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.

Exit mobile version