। रायगड । प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागातील कारकुनासह शिपायाला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे. अँटीकरप्शनच्या पथकाने या दोघांना तातडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. गणपती सण उंबरठ्यावर असताना झालेली कारवाई अधिकाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी ठरली आहे. या कारवाईने लाच घेणाऱ्या अन्य अधिकारी कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. कारवाईसाठी ताब्यात घेतलेल्यांमध्ये कांबळे आणि कावजी या दोन कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या परिसरात आहे. तसेच, एका पेणमधील कंत्राटदारालादेखील ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळत आहे.
बातमी अपडेट होत आहे…







