| मुरूड-जंजिरा | वार्ताहर |
मुरुड तालुक्यातील भंडारी समाजातील सामाजिक, राजकीय, पत्रकारिता, रांगोळी व सिनेसृष्टीतील नऊ कलाकार तथा मान्यवरांचा कै. राजाराम लक्ष्मण खोत मुरुड तालुका भंडारी बोर्डिंगतर्फे सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी खजिनदार अशोक पाटील, काळभैरव पतसंस्थेचे अध्यक्ष दिपक पालशेतकर, स्नेहा पाटील, निशिकांत खोत, राजेंद्र पुलेकर, भालचंद्र घुमकर, विलास खोत, अॅड. पाटील, कासेकर शैलेश खोत व अन्य संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमात आशिष हेदुलकर, सेजल घुमकर, नरेंद्र हेदुलकर, रुपाली चिंदरकर, माधवी खोत, हेमंत नाईक, उदय खोत, अनिरुद्ध खेडेकर, शैलेंद्र पालशेतकर आदींना सन्मानीत करण्यात आले.
भंडारी बोर्डिंगतर्फे मान्यवरांचा सत्कार
