। मुरूड । वार्ताहर ।
मुरूड तालुक्यातील इतिहासात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या लाखमोलाच्या दहीहंडी स्पर्धेत भंडारी समाजाच्या गोविंदांनी पाच थर लावून यशस्वी सलामी दिली होती. त्यामुळे मुरुड भंडारवाडा भंडारी समाजाच्यावतीने सलामी देणार्या दैविक पाटील व महिलांमध्ये सानिका खेडेकर हिचा जाहीर सत्कार करण्यात आला.
श्री काळभैरव मंदिरामध्ये या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. भंडारी समाजाचे अध्यक्ष सुभाष पाटील यांच्या हस्ते या दोन्ही गोविंदांचा पूष्प गुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी उपाध्यक्ष चंदन खोत, अशोक पाटील, दिपक पालशेतकर, प्रकाश मयेकर यांच्यासह भंडारी समाज बांधव उपस्थित होते.