। अलिबाग । वार्ताहर ।
अलिबाग येथील भंडारी बहुउद्देशिय सामाजिक संस्थेच्यावतीने किहीम येथे आयोजित करण्यात आलेल्या भंडारी चषक क्रिकेट स्पर्धेत श्रीवर्धन दांडा येथील भंडारी योद्धा संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. संघ नायक रुपेश चांदविडकर यांच्या नेतृत्वाखालील संघाला 44,444 रु आणि आकर्षक चषक मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.यावेळी उत्कृष्ठ फलंदाज म्हणून गौरव बोरकर आणि उत्कृष्ठ गोलंदाज म्हणून उत्तम भाटकर यांचा गौरव करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील भंडारी समाजातील 16 संघांचा या स्पर्धेत समावेश होता







