| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात पहिला बंडाचा झेंडा फडकवनाऱ्या आ. भरत गोगावले यांना मंत्रिमंडळात समावेश न झाल्याबद्दल प्रथमच जाहीर भाषणात कबुली देताना पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारात माझे नावे होते. मात्र, काही नेत्यांनी मंत्रिपदाची मागणी केल्यामुळे माझे नाव मागे घेण्यात आले. असा गौप्सस्फोट शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.
शिंदे गटाचे पक्ष प्रतोद आमदार भरत गोगावले यांनी दापोलीमध्ये एका सभेत पहिल्या मंत्रीमंडळ विस्ताराबाबत मोठा गौप्यस्फोट केला. यावेळी त्यांनी पहिल्या मंत्रीमंडळ विस्ताराचा मुद्दा उपस्थित करत नवा खुलासा केला आहे.
लवकरच मंत्रीमंडळ विस्ताराचा दुसरा टप्पा पार पडणार आहे. पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारात माझे नाव होते. मात्र, नंतर ते बाद करण्यात आले. मात्र, इतर एक दोन नेत्यांनी मंत्रिपदाची मागणी केली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी माझ्याकडे पाहिले. आणि सांगितले की, जेव्हा शिवाजी महाराज अडचणीत होते. तेव्हा तानाजी मालुसरे धावत आले होते. आधी लग्न कोंढाण्याचे आणि मग माझ्या रायबाचे, अशे तानाजी मालुसरे यांनी शिवाजी महाराजांना सांगितले होते. त्यावेळी मी म्हणालो की काही हरकत नाही. त्याच भूमिकेतील मी माणूस आहे. असा गौप्यस्फोट गोगावले यांनी यावेळी केला.
पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारादरम्यान, शिंदे गटात नाराजीचे सुर पाहायला मिळाले. ज्यांना मंत्रीपद मिळाले नाही त्यांना दुस-या टप्प्यातील मंत्रीमंडळ विस्तारात पद मिळणार असल्यीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मागील आठवड्यात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात रात्री दोन वाजेपर्यंत बैठक झाल्याचे सूत्राने नमुद केले. या बैठकीत शिंदे गट व भाजपमधील काही आमदारांच्या नावावर चर्चा झाली. परंतु, खात्यावरून ही चर्चा निष्फळ ठरल्याचे समजते.
त्यामुळे नवरात्रीत मंत्रिमंडळ विस्तारात वर्णी लागण्याची स्वप्न बघणा-याआमदारांची दिवाळीपर्यंत प्रतीक्षा लांबण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.