पालीत भारत जनजागृती अभियान

पाली/बेणसे | प्रतिनिधी |
तालुका विधी सेवा समिती सुधागड-पालीतर्फे भारत जनजागृती अभियान संपन्न झाले. यावेळी पालीतून जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीत मान्यवरांसह शेठ जे. एन. पालीवाला महविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता.
रॅलीचा सुरुवात पाली न्यायालयापासून करण्यात आली. तिथे मान्यवरांनी मागदर्शन केले. त्यानंतर तहसील कार्यालयाजवळ रॅलीचा सांगता झाली. रॅलीत विद्यार्थ्यांनी विविध फलक हातात घेऊन जनजागृती केली. यावेळी तहसीलदार दिलीप रायण्णावार, गटविकास अधिकारी विजय यादव, पोलीस निरीक्षक विजय तायडे, अ‍ॅड. नितीन शेवाळे, अ‍ॅड. सुभाष पाटील, अ‍ॅड. शहा, अ‍ॅड. सचिन कारखानीस, डॉ. ए. एम. सोहनी, प्रा. एस.एस. खैरनार, मोरेश्‍वर कांबळे व विद्यार्थी सहभागी झाले होते.

Exit mobile version