। अलिबाग । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील मेढेखार येथील समाजाभिमुख, अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले आजातशत्रू भास्कर गणपत पाटील (बी.जी.पाटील) यांचे रविवारी (दि. 1) दीर्घ आजाराने निधन झाले. निधनसमयी ते 86 वर्षांचे होते.
मेढेखारमधील सांस्कृतिक कार्यक्रम, नाट्यमंडळ, कबड्डी या क्षेत्रामध्ये ते अग्रणी असायचे. विकास क्रीडा मंडळाचे ते चिटणीस होते. त्यांनी प्राणाचं दान, प्रेमाचा सौदा, माणुसकी, आई तुला कशी म्हणून मी, सरनोबत, उंबरठ्यावरी माप ठेविते अशा नाटकांतून उत्तम कलाकार म्हणून भूमिका वठवल्या होत्या. ते रायगड जिल्हा परिषदेमध्ये बांधकाम खात्यात नोकरी करुन सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी इंदूमती, मुलगे सुशील व मनोज, दोन मुली, सुना, नातवंड असा मोठा परिवार आहे. कै. भास्कर पाटील यांच्या पार्थिवावर मेढेखार येथील वैकुंठभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पंचक्रोशितील मोठा जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांचा दशक्रिया विधी मंगळवारी (दि. 10) रोजी, तर उत्तरकार्य विधी शुक्रवारी (दि. 13) त्यांच्या राहत्या घरी होणार असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली.






