। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील कावीर येथील रहिवासी पोस्ट खात्यातील आदर्श सेवानिवृत्त कर्मचारी भास्कर तुकाराम प्रधान यांचे अल्पशा आजाराने दि.10 मे रोजी निधन झाले. त्यांच्यावर कावीर येथील स्मशानभूमीत रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. मितभाषी आणि मनमिळाऊ स्वभावाचे प्रधान यांच्या अंत्यविधीला ग्रामस्थ आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. निधनासमयी ते 82 वर्षांचे होते. त्यांच्या पक्षात पत्नी, दोन मुले, दोन मुली, भाऊ, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. भास्कर प्रधान यांचे दशक्रिया विधी दि. 19 मे रोजी सकाळी 9 वाजता कावीर येथे होणार आहेत.