अलिबाग | वार्ताहर |
पेझारी-आंबेपूर येथील प्रसिद्ध बैलगाडीवाले व आधुनिक शेतकरी भास्कर शंकर पाटील यांचे वयाच्या 82 व्या वर्षी मंगळवार, दि. 17 ऑगस्ट रोजी वार्धक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी कुसुम, सुपुत्र चंद्रकांत, अनिल, दत्ताराम कन्या सौ. लता, सौ. संगीता, जावयी, नातवंडं असा मोठा परिवार आहे. त्यांचा दहावा दि.26 ऑगस्ट व तेरावा दि.29 ऑगस्ट रोजी आंबेपूर येथे त्यांच्या राहत्या घरी होणार आहे.