| खरोशी | वार्ताहर |
सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक व कर्मचारी संघटना पेण तालुका यांच्याद्वारे पेण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भाऊसाहेब पोळ हे (दि.31) मे रोजी वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असल्याने त्यांचा सेवापूर्ती समारंभ आयोजित करण्यात आला होता.
यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी सौ.कांबळे, विस्तार अधिकारी प्रसाद म्हात्रे, जिल्हा सेवानिवृत्त संघटनेचे सल्लागार प्र.शं. म्हात्रे, जिल्हाध्यक्ष अमरचंद पाटील, पेण तालुकाध्यक्ष रविकांत ठाकूर, माजी सरपंच रा.ह. पाटील, सुहास पाटील, स.रा. म्हात्रे, अध्यक्ष रामवाडी ज्येष्ठ नागरिक प.जा. म्हात्रे, वि.भा. ठाकूर, प्रदीप म्हात्रे, उज्वला निकम, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख गणेश थवई, मंगेश म्हात्रे तसेच संघटनेचे सर्व पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.
भाऊसाहेब पोळ यांचा सेवापूर्ती सोहळा
