रांगोळीतून उमटले भावरंग

माथेरानमध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी रांगोळी स्पर्धा

| नेरळ | प्रतिनिधी |

माथेरान नगरपरिषदेच्या बी जे हॉस्पिटलच्या माध्यमातून राष्ट्रीय टिबी आणि कुष्ट रोग सर्वेक्षण अभियान सुरू आहे.या अभियानात माथेरान मधील शालेय विद्यार्थ्यांसाठी रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत माथेरान मधील तीन शाळांचे 26 विद्यार्थी सहभागी झाले होते. दरम्यान,विद्यार्थ्यांनी काढलेल्या रांगोळ्या दोन दिवस माथेरान शहरातील नागरिक आणि पर्यटक यांना पाहता येणार आहेत.

माथेरान नगरपरिषदेच्या बी जे हॉस्पिटल यांच्या माध्यमातून राष्ट्रीय टीबी व कुष्ठरोग सर्वेक्षण अभियान 20 नोव्हेंबर ते 6 डिसेंबरदरम्यान राबविण्यात आले. या अभियानाचा शेवट माथेरानमधील शालेय विद्यार्थ्यांच्या रांगोळी स्पर्धेने झाला. 5 डिसेंबर रोजी ही स्पर्धा बी.जे. रुग्णालयात घेण्यात आली. या स्पर्धेत माथेरान शहरातील सेंट झेवियर्स कॉन्व्हेन्ट स्कूल, प्राचार्य गव्हाणकर हायस्कूल आणि हुतात्मा भाई कोतवाल नगरपरिषद शाळा येथील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या तीन शाळांमधील तब्बल 26 विद्यार्थ्यांचा रांगोळी स्पर्धेत सहभाग होता. या स्पर्धेचे नियोजन माथेरान नगरपरिषद मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्या सूचनेनुसार पालिकेच्या बी.जे. रुग्णालयाकडून करण्यात आले होते.

कुष्ठरोग आणि टीबीसंबंधित विषय रांगोळीसाठी विद्यार्थ्यांना देण्यात आले होते. त्यासाठी पालिकेच्या बी.जे. रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रुपाली मिसाळ आणि डॉ. ऋषिकेश केंद्रे तसेच स्टाफ नर्स नेहा गोळे, आरोग्यसेविका अपेक्षा शेलार, प्राजक्ता शिंदे, वृषाली चव्हाण, मीनाक्षी डीगे, आरोग्यसेवक बापू कोंडे, तसेच कर्मचारी राजेश वाघेला, सखाराम कांबडी, अनिता चव्हाण, बाळकृष्ण सांबरी आणि अमित भस्मा यांनी दिवसभर मेहनत घेतली. रांगोळी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी काढलेल्या रांगोळ्या शहरातील नागरिकांना रुग्णालयात येऊन पाहता येणार आहेत. आपल्या विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन बी.जे. रुग्णालयाकडून करण्यात आले आहे.

Exit mobile version