भेंडखळ माजी उपसरपंच चषकाचे आयोजन

भैरवनाथ क्रिकेट संघ विजयी

। उरण । वार्ताहर ।
भेंडखळ माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य सोनाली ठाकूर यांच्या वतीने जय हनुमान क्रिकेट क्लबने भेंडखळतर्फे ठाणकेश्‍वर मैदानावर माजी उपसरपंच चषक 2021 चे आयोजन हितेन भोईर यांच्या वतीने करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये भैरवनाथ क्रिकेट संघाने अंतिम विजेतेदपद पटकाविले.
सदर स्पर्धेचे उद्घाटन भेंडखळ ग्रामपंचायतच्या उपसरपंच तथा विद्यमान सदस्या सोनाली ठाकूर यांच्या हस्ते झाले. सदर स्पर्धेमध्ये 32 संघांनी भाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक भैरवनाथ क्रिकेट संघ, द्वितीय क्रमांक मुळेखंड, तृतीय क्रमांक बी.सी.सी. भेंडखळ तर चतुर्थ क्रमांक नवघर 40 प्लस संघाने पटकाविला. या सामन्यामध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक राजा, उत्कृष्ट गोलंदाज विकी म्हात्रे, उत्कृष्ट फलंदाज जुगल घरत, उत्कृष्ट खेळाडू सिद्धेश ठाकूर तर मालिकावीर हितेन भोईर यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

Exit mobile version