भिकू नथू राऊत यांचे निधन

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील सातीर्जे गावचे ज्येष्ठ नागरिक झिराड विविध विकास सहकारी संस्थेचे सदस्य तथा पंचक्रोशितील प्रगतशील शेतकरी भिकू नथू राऊत यांचे त्यांच्या राहत्या घरी दि. 15 जानेवारी रोजी सकाळी सात वाजता निधन झाले. ते निधन समयी 89 वर्षाचे होते
त्यांचे पश्‍चात पत्नी, एक विवाहित मुलगी तसेच 3 विवाहित मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. ज्येष्ठ पत्रकार तथा झिराड विभाग ज्येष्ठ नागरिक संस्थेचे उपाध्यक्ष अशोक म्हात्रे यांचे ते मेव्हणे होते. भिकू नथू राऊत यांच्या शांत स्वभावामुळे ते परिसरातील जनतेचे अतिशय लोकप्रिय ठरले होते.त्यांचे दशक्रीया कार्य सोमवारी (दि.24) असून, उत्तरकार्य गुरुवारी (दि.27) सातिर्जे येथे होणार आहे.
सातिर्जे स्मशानभूमी येथे कृष्णा खळे यांनी श्रद्धांजली वाहताना त्यांच्या कार्याचा गौरव केला. अंत्य यात्रेच्या वेळी सातिर्जे सरपंच प्राजक्ता खडपे, माजी सरपंच राजेंद्र ठाकूर, माजी जि.प. सदस्य काका ठाकूर, सातिर्जे बहिरदेवी ट्रस्टचे माजी विश्‍वस्त रविंद्र पाटील, माजी सरपंच म्हात्रे, मापगांव पंचायत सदस्य विजय भगत आदी प्रतिष्ठित मान्यवर मंडळी हजर होती.

Exit mobile version