ठाणेश्वरी चषकाचा भोईआळी पाली मानकरी

| पाली/गोमाशी | वार्ताहर |

श्री ठाणेश्वरी चषक ठाणाळे यांच्या वतीने सालाबादप्रमाणे अंडर आर्म ओपनचे षटकार मारीचे क्रिकेट सामने शनिवार, रविवार, दि. 23 व 24 डिसेंबर रोजी ठाणाळे येथे आयोजित करण्यात आले होते. या अंतिम सामन्यात भोईआळी, पाली या संघातील खेळाडूंनी उत्कृष्ट फलंदाजी आणि भेदक गोलंदाजी करत या स्पर्धेतील अंतिम विजयावर मोहर उमटवली.

या स्पर्धेत नामवंत 32 संघांनी आपला प्रवेश नोंदविला होता. या स्पर्धेसाठी क्रीडारसिकांनी गर्दी केली होती. या स्पर्धेतील अंतिम सामना भोईआळी पाली विरुद्ध चव्हाणवाडी या संघात झाला. या अंतिम सामन्यात भोईआळी पाली संघाने विजेतेपद पटकावले. या संघास रोख रक्कम 7 हजार 1 रु. व आकर्षक चषक, तर द्वितीय क्रमांकाचा मानकरी चव्हाण वाडी संघ ठरला. या संघास रोख रक्कम 5 हजार 1 रु. व आकर्षक चषक, तर या स्पर्धेतील बल्लाळेश्वर पाली या संघास तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. या संघास 3 हजार 1 रु. व आकर्षक चषक देऊन मंडळाच्या वतीने गौरविण्यात आले. या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज अजिंक्य फाटे, उत्कृष्ट गोलंदाज विकास, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अंकुश भंडारकर या खेळाडूंना मंडळाच्या वतीने आकर्षक बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले.

Exit mobile version