| पाली/गोमाशी | वार्ताहर |
पाली क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने देऊळवाडा या संघाच्या वतीने अरुण कुमार वैद्य क्रीडांगण पाली येथे दि. 17 व 18 डिसेंबर रोजी मर्यादित षटकांच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अंतिम सामन्यात एनएसइबी बुरमाली संघाने जागृती हायस्कूल नाडसूर संघांचा पराभव करीत विजेतेपदक पटकाविले.
या स्पर्धेत पाली क्रिकेट असोसिएशनला संलग्न 18 संघाने सहभाग घेतला होता. दरम्यान, प्रथम क्रमांकाचा मानकरी एनएसइबी बुरमाली या संघास 15 हजार रुपये व आकर्षक चषक, तर जागृती हायस्कूल नाडसुर संघाला द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. या संघास 10 हजार रु. व आकर्षक चषक, तृतीय क्रमांक भोईआळी पाली या संघास 5 हजार व आकर्षक चषक, तर चतुर्थ क्रमांक सिद्धेश्वर या संघास 5 हजार व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेतील मॅन ऑफ द सीरिज सागर घोलप (सिद्धेश्वर) तर उत्कृष्ट गोलंदाज सुनील भोणकर (सिद्धेश्वर), उत्कृष्ट फलंदाज आकाश जोशी (बुरमाली) या खेळाडूंना आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आले.