लोकनेते दि. बा. पाटील हुतात्मा भवनाचे भूमिपूजन

| उरण | वार्ताहर |

प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील हुतात्मा भवनाचे भूमीपूजन आज जासई येथे सरपंच संतोष घरत यांच्या हस्ते संपन्न झाले. प्रकल्पग्रस्तांचे तारणहार म्हणून लोकनेते दि. बा. पाटील समजले जात होते. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक गौरवशाली लढे उभारून प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून दिला आहे. 1984 च्या गौरवशाली लढ्यात 5 जण हुतात्मे झाले होते. हा देशभर गाजला होता. या लढ्याच्या माध्यमातूनच साडेबारा टक्केचा जन्म झाला.

यावेळी उरणचे सभापती नरेश घरत, उपसरपंच माई पाटील, ग्रामपंचायत सदस्य धीरज घरत, आदित्य घरत, सुदर्शन पाटील, प्रशांत म्हात्रे, रामकिशोर ठाकूर, विनायक पाटील, वीणा घरत, सुलोचना घरत, अश्‍विनी नाईक, हर्षदा तांडेल, श्रुष्टी म्हात्रे, जासई ग्रामस्थ धर्मा पाटील, संजय ठाकूर, रमाकांत म्हात्रे, संतोष घरत, हरी पाटील, रमेश पाटील, किरण घरत, यशवंत घरत, प्रमोद घरत, वंदना पाटील, सुमन म्हात्रे, वंदन म्हात्रे, नीरा म्हात्रे आदी उपस्थित होते.

Exit mobile version