पोलादपूर तालुक्यातील धरणाचे उद्या भूमिपूजन

| पोलादपूर | प्रतिनिधी |

तालुक्यातील प्रलंबित धरणांचा प्रश्‍न अद्याप पूर्णत्वास गेला नसताना रविवारी (दि.6) पैठण गोळेगणी परसुले धरणाचा भूमिपूजन सोहळा सकाळी 10 वाजता पालकमंत्री दय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत आ.भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे. या सोहळयाप्रसंगी दोन्ही शिवसेनांसह भाजपव्यतिरिक्त सर्वपक्षियांची उपस्थिती लाभणार असल्याचे निमंत्रण पत्रिकेतील उल्लेखावरून दिसून येत आहे.

यावेळी जिल्हा जलसंधारण अधिकारी मंगेश साठे, राजिपचे माजी सदस्य चंद्रकांत कळंबे, माजी पोलादपूर पंचायत समिती सभापती व सदस्या दिपिका दरेकर, शेकाप तालुका चिटणीस एकनाथ गायकवाड, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे तालुकाप्रमुख निलेश अहिरे व संपर्कप्रमुख किशोर जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाअध्यक्ष सुहास मोरे, पैठणचे सरपंच संतोष मोरे, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख अनिल मालुसरे, गोळेगणी सरपंच नितीन मोरे, काँग्रेस तालुका अध्यक्ष अजय सलागरे, परसुले सरपंच सुनंदा गो.कदम, प्रकल्प अधिकारी बाबासाहेब शिंदे आणि ठेकेदार प्रकाश मेंगाणे पाटील आदी सर्वपक्षिय उपस्थित राहणार आहेत.

एमआयडीसीच्या रानबाजिरे येथील धरणाखेरिज कोणतेही धरण पूर्णत्वास गेले नसल्याने प्रलंबित धरणांच्या संख्येमध्ये पैठण गोळेगणी परसुले धरणाच्या भुमिपूजन सोहळयामुळे आता वाढ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Exit mobile version