चार कोटींची कामे मंजूर
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील चिंचवली ग्रामपंचायतीमधील मुख्य रस्त्यांची आणि नळपाणी योजनेच्या कामांचे भूमिपूजन आ. महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले. मुंबई म्हनागर प्रदेश विकास प्राधिकरणमधून या कामांसाठी सव्वा तीन कोटींचा निधी मंजूर झाला असून, जलजीवन मिशन मधून 62 लाखांचा निधी नळपाणी योजनेसाठी मंजूर झाला आहे.
या सर्व कामांचा भूमिपूजन सोहळा एक्सळ गावात आयोजित कार्यक्रमात झाला. त्यावेळी आमदार थोरवे यांच्यासह बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते संतोष भोईर, पक्षाचे तालुका प्रमुख संभाजी जगताप, विभाग प्रमुख शरद ठाणगे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संसंख्येने उपस्थित होते.