म्हसळ्यात विकासकामांचे भूमिपूजन

| म्हसळा | वार्ताहर |

म्हसळा शहरातील सुमारे अडीच कोटी रुपयांच्या भूमिपूजन कार्यक्रम खा. सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यामध्ये शहरातील नगरपंचायत हद्दीत काँक्रीट रस्ते व गटार बांधण्यासाठी नागरी सुविधा, अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना, नगरोत्थान आणि रस्ते अनुदान योजने अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या दीड कोटी आणी इतर सात कामांच्या विकास कामांचे भूमिपूजन, त्यामध्ये प्रामुख्याने म्हसळा शहराला पाणी पुरवठा करणारी भापट नळपाणीपुरवठा योजना सुमारे 1.25 कोटी रु. खर्चाचा नवीन बंधारा याचे भूमिपूजन, तसेच अंजुमन हायस्कूल येथील संरक्षक भिंत, शहरातील रस्ते आणि गटार, बौद्धवाडी कडील अंतर्गत रस्ते इत्यादी कामांची उदघाटने खा. सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आली.

यावेळी नगराध्यक्ष असहल कादिरी, उपनगराध्यक्ष संजय दिवेकर, मुख्याधिकारी विराज लबडे, महादेव पाटील, नाजीम हसवारे, समीर बनकर, महेश शिर्के, संजय कर्णिक, सुनील शेडगे, सोनल घोले, शगुप्ता जहांगीर, करण गायकवाड, नौशीन चोगले, सुमैया आमदानी, सरोज म्हशीलकर, मेहजबिन दळवी, नगरसेवक नसीर मिठागरे, निकेश कोकचा, संतोष सावंत, समीर काळोखे आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version