। म्हसळा । वार्ताहर ।
खासदार सुनिल तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांनी म्हसळा तालुक्यात दुसरा दौरा करून म्हसळा पंचायत समितीच्या सभागृहात एकत्रित आढावा सभा घेतली. यावेळी त्यांनी शासनाच्या विविध विकास निधीतून म्हसळा तालुक्यातील गाववाडी वस्तीमधील विकास कामांसाठी सुमारे 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचे माहिती दिली.
विकास कामांमध्ये प्रामुख्याने राज्य मार्ग गावजोड रस्ते, सामाजिक सभागृह, शाळा, अंगणवाडी, महिला कार्यशाळा, स्मशानभूमी सुधारणा, वीज, पाणीपुरवठा, पर्यटन विकास आदी कामांचा समावेश असल्याचे त्यांनी जाहीर केले. या सभेला खा. सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे यांच्यासमवेत उपविभागीय अधिकारी अमित शेडगे, अधीक्षक डॉ. श्रीम.गोरे, तालुका अध्यक्ष समीर बनकर, माजी सभापती महादेव पाटील, नाजीम हसवारे, तहसीलदार समीर घारे, पोलीस निरीक्षक संदीपान सोनवणे, गटविकास अधिकारी भाऊसाहेब पोळ, नगर अध्यक्ष असहल कादिरी, अंकुश खडस, व्यंकटेश सावंत, गटनेते संजय कर्णिक आदी मान्यवर उपस्थित होते.