मोग्रज नळ पाणीपुरवठ्याचे योजनेचे भूमिपूजन

| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील मोग्रज ग्रुप ग्रामपंचायतीमधील ग्रामस्थांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून नळपाणी पुरवठा योजना मंजूर झाली आहे. 13 कोटी 21 लाख खर्चाचे या नळपाणी योजनेचे भूमिपूजन झाले असून, या भागातील पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरणार असल्याचे प्रतिपादन आ. महेंद्र थोरवे यांनी केले. ते पुढे म्हणाले की, 13 कोटी खर्चून उभारण्यात येत असलेल्या मोग्रज ग्रामपंचायत हद्दतील भक्ताचीवाडी, पिंगळस, जांभुळवाडी,धामणी,चौधरवाडी येथे या नळपाणी योजनेचे पाणी पोहचवले जाणार आहे.

याप्रसंगी राजिप माजी सभापती नारायण डामसे, कर्जत पं.स. माजी सभापती राहुल विशे, दिलीप ताम्हाणे, प्रसाद थोरवे, भगवान घुडे, रामचंद्र मिनमीने, पंढरीनाथ पिपरकर, संदेश सावंत यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य मीनाक्षी भोईर, मंगेश आगीवले, राजेश भोईर, अशोक आसवळे आदींसह ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Exit mobile version