विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलचे भूमिपूजन

| वावोशी | वार्ताहर |

वावोशी येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेअंतर्गत चालवण्यात येणाऱ्या विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कूलच्या आणखी एका नवीन इमारतीचा भूमिपूजन सोहळा 14 डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा झाला.

विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या बसण्याची गैरसोय होऊ नये म्हणून शालेय प्रशासनाने विद्यार्थ्यांसाठी एक नवीन इमारत बांधण्याची मोहीम हाती घेतली आणि या अनुषंगाने इमारतीचा भूमिपूजन सोहळा 14 डिसेंबर रोजी विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमाला स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे विभाग प्रमुख श्री. हाके, श्री. बेडगे, एस एच. पाटील, गोदरेज अँड बॉईस सिएसआर व्यवस्थापक चव्हाण, किशोर पाटील, रमेश पाटील, विद्याधर जाधव, मुख्याध्यापक गावित, भालचंद्र पाटील, जगदीश पाटील, अनिल मरागजे, शबीर पटेल, एल बी पाटील, उमेश पाटील, हनुमंत मोरे, सतीश शेवाळे, छत्रपती विद्यालय व ज्युनिअर कॉलेज शिक्षक वृंद छत्तीशी विभागातील सामाजिक, राजकीय तसेच शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी आपली उपस्थित होते.

Exit mobile version