| कर्जत | वार्ताहर |
येथील सहकार नगरमधील कृषी उत्पन्न बाजार समिती उभारत असलेल्या बहुउद्देशीय इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. या इमारतीमध्ये गोडाऊन व कार्यालयांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात बहुउद्देशीय इमारतीच्या भूमिपूजन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. सचिव सुरेश हजारे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर संचालिका अर्चना शेळके यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश फराट, उपसभापती कृष्णा बदे, माजी सभापती विलास थोरवे, गजानन पेमारे, शरद लाड, विष्णू कालेकर, दिनेश जैन, केतन झांजे, संतोष वैखरे, रमाकांत जाधव, मच्छिंद्र कुलाल, दिलीप शेळके यांच्यासह वासुदेव भोईर, हेमंत ठाकरे आदी उपस्थित होते. एक कोटी दहा लाख रुपये खर्च करून ही इमारत उभारण्यात येणार असल्याचे फराट यांनी सांगितले.







