अंबिका नगर रस्त्याचे भूमीपुजन

। पेण । वार्ताहर ।
पेण शहरातील डोंगरी हा प्रभाग मा.उपनगराध्यक्षा अरुणा पाटील व कर व शुल्क सभापती सुहास पाटील यांच्या हस्ते अंबिका नगर डोंगरी येथील रस्त्याचे श्रीफळ वाढवून भुमीपुजन करण्यात आले. यावेळी मोठया प्रमाणात या परिसरातील नागरिक उपस्थित होत. एकीकडे सुहास पाटील हे स्वबळावर गेली 10 वर्ष या प्रभागाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. त्यामुळे सत्ताधारी हे त्यांना दचकुनच असतात. त्यामुळे त्यांच्या प्रभागातील विकासकामे अडविण्याचे धाडस सत्ताधारी करत नाहीत. तसेच ते राजकारणा पलिकडे जाउन सर्वसामान्यांना मदत करत असल्याने सर्वसामान्य जनता देखील त्यांच्या सोबत आहेत या रस्त्याचे भुमीपुजन नगराध्यक्षांच्या हस्ते होणार होते. परंतु त्या कार्यक्रमासाठी सुहास पाटील व अरूणा पाटील यांना डावळण्याचा प्रकार होणार होता म्हणुन लोकाआग्रहा खातीर सुहास पाटील यांनी नगराध्यक्षांच्या आगोदरच या रस्त्याचे भुमीपुजन करुन घेतले. या भुमीपुजनामुळे सर्व स्तरातून सुहास पाटील व अरुणा पाटील यांचे कौतुक होत आहे.

Exit mobile version