आंबेत खाडीपट्ट्यात विकासकामांचे भूमिपूजन

। आंबेत । वार्ताहर ।
म्हसळा तालुक्यातील आंबेत खाडीपट्टा विभागात रविवारी (दि.15) अनेक विकासकामांचे उद्घाटन पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गडदाव, संदेरी येथील सभामंडप, पेव्हर ब्लॉक रस्ते, स्मशान शेड, अंतर्गत रस्ते आशा अनेक मार्गी लागलेल्या विकासकामांचा यात समावेश आहे. याप्रसंगी म्हसळा समन्वय समिती अध्यक्ष नाझीम हसवारे, मा. सभापती उज्वला सावंत, मा.उपसभापती मधुकर गायकर, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष महेश शिर्के, कार्यध्यक्ष जयंत चिबडे, सरपंच फारुख हजवाने, सामाजिक कार्यकर्ते संतोष ताम्हणकर यांसह अन्य कार्यकर्ते ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version