पनवेलमध्ये ई-टॉयलेटचे भूमिपूजन

। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त परिसरातीन गार्डन हॉटेल येथे महिलांकरिता बसविण्यात येणार्‍या ई-टॉयलेटचे भूमिपूजन विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांच्या पत्नी ममता म्हात्रे यांच्या हस्ते पार पडले.
याप्रसंगी शेकाप जिल्हा चिटणीस गणेश कडू, शेकाप महिला आघाडी प्रमुख अनुराधा ठोकळ, पनवेल अर्बन बँकेच्या संचालिका माधुरी गोसावी, नगरसेविका डॉ.सुरेखा मोहोकर, नगरसेविका सारिका भगत, नगरसेविका प्रिया भोईर, नगरसेविका उज्वला पाटील, युवा नेते अतुल भगत, विजय पाटील, विजय भोईर, आशिष पाटील महिला आघाडीच्या सुजाता ठक्कर, जयश्री पाटील, वैशाली शहा, कविता ठाकूर, सुवर्णा शिर्के, रुपाली कोळी, झडच् ग्रुपचे शितल ठक्कर, तालुका पोलीस निरीक्षक मोनाली चौधरी, पोलीस निरीक्षक पवार मॅडम, रोट्रक्ट हॉरिझोन ग्रुपचे अवेही बताले, इशा शिंदे तसेच महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होते. शेतकरी कामगार पक्षाच्या नगरसेविका नगरसेविका डॉ.सुरेखा मोहोकर तथा नगरसेविका प्रिती जॉर्ज(म्हात्रे) यांच्या पाठपुराव्यामुळे हे काम मार्गी लागले असून, याबाबत परिसरातील महिला वर्गाने समाधान व्यक्त केले आहे.

Exit mobile version