लावेचीवाडी येथे सभामंडपाचे भूमिपूजन

| नागोठणे | वार्ताहर |
पाटणसई ग्रामपंचायत हद्दीतील लावेचीवाडी (वासगाव ) येथे जि. प. सेस फंड (20 %) अंतर्गत 5 लाख रुपये निधीतुन सभामंडप बांधण्यात येणार असून या सभामंडपाचे भूमिपूजन रोहा पं.स.चे माजी सभापती सदानंद गायकर यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. यावेळी भाई टके, शिवरामभाऊ शिंदे, संतोष कोळी, सचिन कळसकर, विनय गोळे, प्रमोद जांबेकर, बाळकृष्ण देवर झिमाशेठ कोकरे, लिंबाजी पिंगळा, दीपक महाडिक, गणपत पिंगळा, बेबीताई पिंगळा, दुर्धादास उघडा, चंद्रकांत बावदाने, जानू शिद, के. के. शिद, यशवंत पिंगळा उपस्थित होते.

Exit mobile version