| कोर्लई । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील बेलोशी ग्रामपंचायत हद्दीतील दुर्गम डोंगराळ ग्रामीण भागातील बेलोशी आदिवासीवाडी येथील रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना लायन्स क्लबतर्फे शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
सर्व उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. तालुक्यातील दुर्गम डोंगराळ ग्रामीण भागातील जीवनशैली व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबद्दल मुख्याध्यापक बळिराम पाटील व शिक्षक निलेश तुरे यांनी आपल्या प्रास्ताविकात मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी खूप शिकले पाहिजे, ज्ञान घेतले पाहिजे, गुरुजनांचा आदर ठेवला पाहिजे तर मोठे झाल्यावर प्रगतीची शिखरे गाठता येतील. त्यासाठी लायन्स क्लबच्या माध्यमातून तुम्हाला सहकार्य केले जाईल, असे लायन्स क्लब ऑफ श्रीबाग सेंटेनिअल अध्यक्ष अॅड. डॉ. के. डी. पाटील यांनी सांगितले. यावेळी लायन्स क्लबतर्फे मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या, पेन शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी लायन्स क्लब ऑफ श्रीबाग सेंटेनिअल अध्यक्ष अॅड. डॉ.के.डी. पाटील, उपाध्यक्ष लायन श्रीकांत पाटील, प्रा.पी.एन.पाटील, अॅड. विक्रांत पाटील, कुरुळचे माजी सरपंच मनोज ओव्हाळ, जानू शिद, लिओ लायन्स स्मित भगत, आयुष भगत, अभिषेक चौधरी, बाळराम शिद, शालेय व्यवस्थापन समितीचे परम सोनार, शैलेश शिंदे, किशोर पिंगळा, बामा शिद, जाया निरगुडा, मुख्याध्यापक बळिराम पाटील, शिक्षक निलेश तुरे, ग्रामस्थ उपस्थित होते.