| कोर्लई | वार्ताहर |
मुरुड तालुक्यातील काशिद ग्रामपंचायत हद्दीतील पर्यटनात प्रसिद्ध असलेल्या प्रकृती रिसॉर्टच्या निसर्गरम्य परिसरात मालक प्रभाकर शेट्टी व शामला शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकृती रिसॉर्टच्या टिमने सालाबादप्रमाणे यंदाही विविध प्रकारची झाडे लावून वृक्षारोपण करण्यात आले.
प्रकृती रिसॉर्टच्या माध्यमातून ग्रामपंचायत हद्दीतील परीसरात विविध उपक्रम राबविण्यात येतात. यामध्ये दरवर्षी साधारणतः पावसाळ्यात लाखो रुपये खर्चून, विविध प्रकारची झाडे लावण्यात येऊन वृक्षारोपण करण्यात येते. त्याचाच भाग यंदाही प्रकृती रिसॉर्टच्या निसर्गरम्य परिसरात व डोंगर भागात आपटा (कांचन), बांबू, बेल, रेडमाचिरा, बॉटल ब्रश, बिसमार्किया आदी. लाखो रुपयांची विविध प्रकारची झाडे लावण्यात येऊन वृक्षारोपण करण्यात येत आहे. त्याचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. यावेळी प्रकृती रिसॉर्टचे प्रभाकर शेट्टी, प्रकृती रिसॉर्टची सर्व टिम उपस्थित होती.