। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यात बचत गटांच्या चळवळीला आणखी बळ देण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या माध्यमातून गणेशोत्सव निमित्ताने प्रदर्शन मांडण्यात आले आहे. कर्जत तालुक्यातील 65 बचत गटांनी आपण बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन मांडले होते.
कर्जत तालुक्यातील महिला स्वयंसहायता महिला बचत गट यांनी बनवलेल्या वस्तूंच्या विक्रीचे प्रदर्शन नेरळ येथे भरवण्यात आले आहे. नेरळ येथील बापूराव धारप सभागृहात हे वस्तू प्रदर्शन भरवण्यात आले होते. प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी या अभियानाचे कर्जत तालुका व्यवस्थापक राजू नेमाडे, उमेद संस्थेच्या तालुका अध्यक्ष रेखा हिरेमठ, सचिव दिशा भोईर, खजिनदार योगिता कोळंबे, तसेच अन्य पदाधिकारी यांच्यासह या अभियानाचे विभाग समन्वयक अविनाश जाधव, रामराव हानुमंते, रेश्मा लांडगे, स्वाती वाघ आणि मनोहर जाधव, समूह साधन व्यक्ती शोभा शेंडे, तन्वी भवारे आदी उपस्थित होते.या प्रदर्शनात माऊली महिला बचत गट नेरळ पाडा,वेंदात बचत गट चिंचआळी नेरळ, महालक्ष्मी बचत गट, स्वराज्य बचत गट बार्डी, स्वागत बचत गट उकरूळ, अहिल्याबाई बचत गट भडवळ, सावित्रीबाई फुले महिला बचत गट मुगपे, विठु माऊली बचत गट वडवली, कल्याणी बचत गट बीड, परी महिला बचत गट चांदई, ओमकार बचत गट नेरळ, अबोली बचत गट नेरळ, माऊली बचत गट आंबिवली, पौर्णिमा बचत गट माणगाव, जय मल्हार बचत गट नेरळ, पंचशील बचत गट माणगाव तर्फे वरेडी, वैष्णवी बचत गट नेरळ, साई आदिवासी बचत गट बेडीस गाव, रामवरदायिनी बचत गट शेलू, स्वामींनी बचत तसेच लक्ष्मी बचत गट आदी बचत गटांनी आपले स्टॉल लावले होते.
यावेळी प्रामुख्याने सहभागी असलेले महिला बचत गट तालुक्याच्या वेगवेगळ्या भागातून आले होते. यामुळे महिलांना वस्तू उपलब्ध होऊ शकल्या अशी माहिती रेखा हिरेमठ यांनी दिली.
या उत्पादनांची विक्री
खाद्य पदार्थ, वाळवीचे पदार्थ, लोणचे, खारोटी, पापड, सरबते, लादी पुसण्याचे लिक्विड, भांडी घासण्याची पावडर आणि साबण, भांडी घासण्याची लिक्विड, तसेच हस्तकला वस्तू, बांगड्या, फरसाण आदी पदार्थ विक्रीस होते.