श्री बापदेव मंदिर सभागृहाचे भूमिपूजन

पालकमंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती
। श्रीवर्धन । वार्ताहर ।

येथील श्री बापदेव मंदिर सामाजिक सभागृह भूमिपूजन सोहळा पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते रविवारी (दि.9) संपन्न झाला. आमदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम सन 2021-22 अंतर्गत अंदाजित 16 लाख रुपये खर्च येणार असून भाविकांमधे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
श्रीवर्धन शहरात दुपारी मारळ येथील बंधार्‍याच्या कामाबाबत शासकीय विश्रामगृहात आढावा बैठक झाल्यानंतर श्री बापदेव मंदिर सामाजिक सभागृह भूमिपूजन, परीट आळी येथील सामाजिक सभागृह भूमिपूजन, कुंभारआळी येथील सामाजिक सभागृह भूमिपूजन असे विविध सोहळ्यांच्या कार्यक्रमास पालकमंत्री आदिती तटकरे श्रीवर्धन येथे आल्या होत्या.
यावेळी माजी नगराध्यक्ष फैसल हुर्जुक, जितेंद्र सातनाक, किरण केळस्कर, सुनील पवार, दिशा नागवेकर, शबिस्ता सरखोत, रहमत आराई, दत्तात्रेय कोसबे, चंद्रकांत हुंदिलकर, उमेश आमले उपस्थित होते.

Exit mobile version