सारडे गावात विविध विकास कामांचे भूमीपूजन

। उरण । वार्ताहर ।
सारडे ग्रामपंचायतीच्यावतीने सारडे गावातील विविध विकास कामांचे भूमीपूजन व उद्घाटन समारंभ शेकाप रायगड जिल्हा चिटणीस व पक्ष प्रतोद अ‍ॅड. आस्वाद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. उरण पंचायत सभापती समिधा म्हात्रे, पक्ष प्रतोद व राजिप सदस्य बाजीराव परदेशी, उपसभापती शुभांगी पाटील, माजी सभापती सागर कडू, माजी राजिप सदस्य जीवन गावंड, माजी पंचायत सदस्य रमाकांत पाटील, शेकाप युवा नेते निलेश म्हात्रे, मनोज पाटील यांच्या उपस्थितीत पि.डब्ल्यू.डी. रस्ता ते सारडे तलाव पर्यंतचा रस्ता, राजिप शाळा सारडे येथील संरक्षण भिंतीच्या कामाचे भूमीपूजन करण्यात आले. रा. जि. प. शाळेच्या सभागृहाचे उद्घाटन आस्वाद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्तविकात सरपंचांनी गेल्या चार वर्षात ग्रामपंचायतीच्या मार्फत सारडे गावासाठी केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा मांडला. यावेळी गावातील दिव्यांगांना 5% ग्रामनिधीतून धनादेशाचे वाटप करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत सरपंच चंद्रशेखर पाटील, समीर पाटील, श्यामकांत पाटील, भारती पाटील, अपेक्षा पाटील, भगवती पाटील, भार्गव म्हात्रे, संचिता केणी यांनी केले. या कार्यक्रमासाठी ध.प. पाटील, छ. ल. पाटील, जो. ल. पाटील, ए.डी. पाटील, एच. के. पाटील, अ‍ॅड हिरामण पाटील, महिला बचत गटातील महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुत्रसंचालन रोहन पाटील यांनी केले. तर आभार चंद्रशेखर पाटील यांनी मानले.

Exit mobile version