कुस्ती स्पर्धेत भूमिका खंडागळेला कांस्य

| कर्जत | प्रतिनिधी |

मुंबई विद्यापीठ क्रीडा मंडळ आणि के.एम.सी. महाविद्यालय खोपोली आयोजित आंतरमहाविद्यालयीन (कोकण विभाग) कुस्ती स्पर्धा नुकतीच के.एम.सी. कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, खोपोली, रायगड येथे संपन्न झाली. या स्पर्धेत अभिनव ज्ञान मंदिर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय कर्जतची भूमिका किरण खंडागळे हिने 50 कि. या गटात कांस्यपदकाची कमाई केली.

या स्पर्धेचे डॉ मोहन आमृळे डॉ. जयवंत माने के.एम.सी. कॉलेज, खोपोली यांनी नियोजन केले होते. या स्पर्धेत सहभागी स्पर्धक पुरुष व महिला स्पर्धक सहभागी झाले होते. उद्घाटन के.एम.सी. कला, विज्ञान व वाणिज्य चे क्रीडा विभाग प्रमुख डॉ.जयवंत माने व तसेच क्रीडा विभाग मुंबई विद्यापीठ येथून आलेले पंच यांच्या हस्ते प्रथमता विद्येची आराध्य देवता सरस्वती मातेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.जयवंत माने यांनी केले. या स्पर्धेत अभिनव ज्ञान मंदिर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय कर्जत येथील महिला गटातून 50 कि. या गटातून भूमिका किरण खंडागळे या स्पर्धकाला कांस्य पदक व प्रमाणपत्र डॉ. जयवंत माने यांच्याकडून प्रदान करण्यात आले. या विद्यार्थीनीस मार्गदर्शन करणारे क्रीडा विभाग प्रमुख प्रा. गणेश पाटील व सहकारी प्रा. मंदार लेले, प्रा. प्रशांत दळवी, प्रा. अंजली शर्मा या सर्वांनी मोलाची भूमिका पार पडली. अभिनव मंदिर संस्थेचे अध्यक्ष गणेश वैद्य आणि सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण घोडविंदे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version