| रोहा | प्रतिनिधी |
मुंबई विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्ष, कोकण एज्युकेशन सोसायटीचे डॉ.चिंतामणराव देशमुख वाणिज्य व कुसुमताई ताम्हाणे कला महाविद्यालय रोहा राष्ट्रीय सेवा योजना विभाग व जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग अलिबाग-रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने या महाविद्यालयाच्या सभागृहात नुकताच एड्स प्रतिबंधात्मक जनजागृतीवर आधारीत प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न झाली.
या स्पर्धेत के.एल.ई. महाविद्यालय कळंबोलीच्या साक्षी सिंग व सुमन जाह यांच्या टीमने प्रथम क्रमांक मिळविला. तर डी.जी.तटकरे महाविद्यालय तळा महाविद्यालयाच्या सुमित मोरे व दामेश तांबट यांच्या टीमने द्वितीय क्रमांक मिळविला तर को.ए.सो.डॉ.सी.डी.देशमुख महाविद्यालयाच्या अनिशा शेटे व समृद्धी सानप यांच्या टीमने तृतीय क्रमांक मिळविला. विजेत्या टीमना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची रुपये 3000, 2000 व 1000 रुपयांची पारितोषिके व प्रमाणपत्र देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
स्पर्धेस प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ.अतुल साळुंके प्रा. तुळशिदास मोकल, संजय माने, रविंद्र कदम, रश्मी सुंकले, महेश गोसावी, मंगेश पाटील, रुपेश पाटील, प्रा.अनंत थोरात, डॉ.गजानन मुनेश्वर आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील शेठ जे.एन.पालिवाला महाविद्यालय पाली, को.ए.सो. आनंदीबाई प्रधान महाविद्यालय नागोठणे, को.ए.सो.डॉ.सी.डी.देशमुख महाविद्यालय रोहा, के.एल.ई. महाविद्यालय कळंबोली,भाऊसाहेब नेने महाविद्यालय पेण,कोकण ज्ञानपीठ महाविद्यालय कर्जत, जे.एस.एम. महाविद्यालय अलिबाग, डॉ.नानासाहेब धर्माधिकारी महाविद्यालय कोलाड, डी.जी.तटकरे महाविद्यालय तळा, वसंतराव नाईक महाविद्यालय मुरुड, टिकमभाई मेहता महाविद्यालय माणगांव, पी.एन.पी. महाविद्यालय वेश्वी अलिबाग, पिलाई महाविद्यालय पनवेल, एम.बी.मोरे. महाविद्यालय धाटाव आदी महाविद्यालयाच्या टीम सहभागी झाल्या होत्या.