हडकणी नांदगाव रस्त्याचे भूमीपूजन

। चिपळूण । वार्ताहर ।
माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या प्रयत्नाने मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या चिपळूण तालुक्यातील हडकणी घागवाडी ते नांदगाव या सुमारे 3.200 कि.मी. लांबीच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी हडकणी मुंबई मंडळाचे अध्यक्ष विलास घाग, ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष अशोक घाग, स्वप्नील घाग, अरुण आधटराव, अनंत तळेकर, प्रमोद घाग, पोलीस पाटील पांडुरंग घाग यांच्यासह उपतालुकाप्रमुख सुभाष गुरव माजी जिल्हापरिषद सदस्या प्रज्ञा धनावडे, विभागप्रमुख सिद्धार्थ कदम, विभागप्रमुख रुपेश घाग, कुठरे सरपंच राजू गुजर, आगवे तंटामुक्त समिती अध्यक्ष एकनाथ भंडारी, पंकज साळवी, ठेकेदार सुरेश चिपळूणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना सदानंद चव्हाण म्हणाले की, कोरोना आणि त्यातून निर्माण झालेली समस्या यामुळे हे काम थांबले होते, मात्र आता या कामाला खर्‍या अर्थाने सुरवात झाली असून मी केलेल्या कामाची आठवण ठेवून तुम्ही मला निमंत्रित केले, हीच आपली संस्कृती फार मोलाची आहे.

Exit mobile version