। चिपळूण । वार्ताहर ।
कृषी व जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कृषी विभाग, सामाजिक वनीकरण विभाग व नायशी ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने गुरूवारी (दि. 5) नायशी ग्रामपंचायत कार्यालयात कृषी मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला जास्तीतजास्त शेतकर्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सरपंच संदिप घाग यांनी केले आहे.
या मेळाव्यात चिपळूण तालुका कृषी विभागाचे कृषि सहाय्यक आकाश चव्हाण व सामाजिक वनीकरण विभागाचे वनक्षेत्रिय कर्मचारी उपस्थित राहून शेतकर्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर तलाठी सजा कोकरे साकसमुद्रे व नायशी ग्रामसेवक सोनवणे आदी अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या शेतकरी मेळाव्याला कृषी विभागाच्या भात लागवडीच्या विविध पद्धती, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत फळबाग लागवड 100 टक्के अनुदानावर आधारित योजना, वातावरणावर आधारित बदलती पिक पद्धती, ऑनलाईन ट्रॅक्टर पॉवर टिलर ग्रास कटर नोंदणी, कृषी विभागाच्या विविध योजना बद्दल मार्गदर्शन व ग्राम कृषी विकास समिती आदी योजनेवर मार्गदर्शन करणार आहेत. तर, समाजिक वनीकरण विभागातील खैर लागवड व अन्य शासकीय योजनेवर मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्याचा गावातील शेतकरी व ग्रामस्थांनी लाभ घ्यावा, असे आहवान सरपंच संदिप घाग यांनी केले आहे.