आराळी येथे नळपाणी योजनेचे भूमिपूजन

। रोहा । प्रतिनिधी ।
रोहा तालुक्यातील भालगाव ग्रामपंचायत हद्दीतील आराळी गावातील नळपाणी योजनेचे भूमिपूजन शेकाप रोहा तालुका पुरोगामी युवक संघटना उपाध्यक्ष नंदेश यादव यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
आराळी येथील ग्रामस्थांनी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यपद्धतीवर विश्‍वास ठेवत पंडीत पाटील यांच्या उपस्थितीत शेकापमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी शेकाप नेते पंडीत पाटील व जिल्हा चिटणीस तथा खारगाव जिप सदस्य यांनी आराळी ग्रामस्थांची पाण्याची समस्या दूर करण्याचे वचन दिले होते. आराळी नळपाणी योजना भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी ज्येष्ठ कार्यकर्ते किसन घाग, मुंबई मंडळ अध्यक्ष परशुराम भेरे, अलपेश खेमन, प्रफुल्ल घाग, पुजा पानगळे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version