नवीन शेवा येथे पाईप लाईनचे भूमिपूजन

| उरण | वार्ताहर |
नवीन शेवा येथे पाण्याच्या नवीन पाईप लाईनचे भूमिपूजन माजी आ.मनोहर भोईर यांच्या हस्ते करण्यात आले. पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून भोईर यांनी जल जीवन मिशन या योजने अंतर्गत पाण्याच्या नवीन पाईप लाईनची कामे मंजूर करून घेतली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नवीन शेवा येथे पाण्याच्या नवीन पाईप लाईनच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी दनेश पाटील, नरेश रहाळकर, महादेव घरत, संतोष ठाकूर, हिराजी घरत,दीपक ठाकूर, के. एम् . घरत, गणेश म्हात्रे, सरपंच आदिनाथ भोईर, शाखाप्रमुख शैलेश भोईर उपस्थित होते.

Exit mobile version