| पेण | वार्ताहर |
रायगडच्या राजकारणात भाजपेच आ.रवीशेठ पाटील आणि खासदार सुनील तटकरे यांच्या नात्यातील तणाव पुन्हा एकदा पेणकरांना पहायला मिळाला आहे. रायगड तलाठी भवन इमारतीच्या भूमिपूजन सोहळयाच्या निमंत्रण पत्रिकेवर भाजपचे स्थानिक आ. रवीशेट पाटील यांचे नाव डावलल्याने या चर्चेचा उधाण आले आहे.
आ. अनिकेत तटकरे यांच्या स्थानिक विकास निधीमधून रायगड जिल्हा तलाठी संघाच्या इमारतीच्या कामासाठी निधीची उपलब्धता झाली आहे. तसेच या कामाचे ठेकेदार नेमून कामाचे भूमिपूजन रामवाडी येथे 9 मे रोजी झाले. या निमंत्रण पत्रिकेमध्ये खा. सुनील तटकरे, पालकमंत्री अदिती तटकरे, आ. अनिकेत तटकरे यांच्याबरोबर रायगड जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांची नावे आहेत. नियमाप्रमाणे ज्या तालुक्यात विकासकामांचे भूमिपूजन करायचे आहे, तेथील स्थानिक आमदारांना बोलवणे गरजेचे असते. परंतु रायगड जिल्हा तलाठी संघाकडून न केल्याने दोघांमधील तणाव चव्हाट्यावर आला आहे.
आ. अनिकेत तटकरे यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाला असला तरी उपलब्ध होणारा निधी हा जनतेच्या पैशातून उभा केलेला असतो. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून आमदारांना बोलावणे गरजेचे असते. असे न झाल्याने पुन्हा एकदा खासदार सुनील तटकरे आणि आमदार रवीशेट पाटील यांचा वाद चव्हाटयावर आला आहे.