काशीनाथ लबडे यांना भूषण पुरस्कार जाहीर

| रसायनी | वार्ताहर |

रसायनीतील वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील नवीन पोसरी येथील गेली 35 वर्ष कीर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य करणारे ह.भ.प. गुरूवर्य काशिनाथ महाराज लबडे यांना ’’श्री संत तुकाराम महाराज भूषण पुरस्कार’’ जाहीर झाला आहे. फिरता सप्ताह भारत देशाचे ह.भ.प. गणेश महाराज यांनी या पुरस्काराची घोषणा केली आहे. तर 22 जानेवारी 2024 पासून तीन दिवस शैलम, तेलंगणा येथे होणार्‍या भव्य सप्ताह सोहळ्यात काशिनाथ महाराज लबडे यांना श्री संत तुकाराम महाराज भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. काशिनाथ महाराज लबडे यांना श्री संत तुकाराम महाराज भूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल रसायनी, पाताळगंगा येथील कीर्तनकार, प्रतिष्ठित नागरिकांनी अभिनंदन केले आहे.

Exit mobile version