। रसायनी । वार्ताहर ।
खानावले येथील माजी प्रभारी सरपंच मोहन बाळाराम लबडे व योगिता मोहन लबडे यांच्यावतीने वडिल बाळाराम कोंडाजी लबडे यांच्या स्मरणार्थ श्री क्षेत्र पैठण येथे पाच दिवस अखंड हरिनाम उत्सवात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या उत्सवात रसायनी, चौक, बारवई पंचकोशीसह खालापूर पनवेल तालुक्यातील वारकरी सहभागी झाले होते. पाचशेपेक्षा अधिक नागरिक या उत्सवांत हरिनामाच्या जयजयकारात तल्लीन झाल्याचे दिसून आले.
यावेळी गुरुवर्य महंत आनंद महाराज खंडागळे चौक, गुरुवर्य जगन्नाथबाबा रत्नाकर, दामोदर सिताराम लबडे, काशिनाथ महाराज लबडे, शांताराम सिताराम लबडे यांचे किर्तन झाले. उत्सव यशस्वी करण्यासाठी मोहन बाळाराम लबडे सांच्या मार्गदर्शनाखाली श्री सद्गुरु माऊली सेवा मंडळ चौक, संत तुकाराम वारकरी मंडळ बारवई परिसर यांनी परिश्रम घेतले. मोहन लबडे आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ दरषर्षी श्री क्षेत्र पैठण येथे अखंड हरिनाम उत्सवाचे आयोजन करत असल्याने वारकरी सांप्रदायाकडून कौतुक होत आहे.