| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
लायन्स क्लब मांडवातर्फे चोंढी येथील साहेब कॉम्प्लेक्समध्ये गरजू विद्यार्थीनींसाठी सायकल वाटप आणि महिला सशक्तीकरणाबाबत अॅड. पल्लवी तुळपुळे, अॅड. कादंबरी काळे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
ऑक्टोबर सेवा सप्ताहाअंतर्गत लायन्स क्लब मांडवाचे विविध उपक्रम सुरु आहेत. याचा एक भाग म्हणून सायकल वाटप व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी लायन्स हेल्थ फाऊंडेशनचे उपाध्यक्ष नितीन अधिकारी, लायन्स क्लब मांडवाचे अध्यक्ष बी.एन. कोळी, उपाध्यक्ष अभिजीत गुरव, सचिव सुमीत पाटील, खजिनदार विलास पाटील, अमिश शिरगावकर, मोहन पाटील, धवल राऊत, जितेंद्र ठाकूर, हर्षद पाटील, विद्या अधिकारी ला.उज्ज्वला पाटील, मीनल ठाकूर, मृदुला राऊत, सविता साळशिंगेकर, शीतल सिनकर, सारिका पाटील, जितेश्री ठाकूर, मानसी पाटील, सुमंगला कोळ, समता राऊत, स्मितल शिरगावकर, प्रीती पाटील आदी