। कर्जत । वार्ताहर ।
सद्भाव फाउंडेशन मुंबई शाखा कर्जत यांच्या सौजन्याने ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणाकरिता प्रवास साधन म्हणून मोफत सायकलीचे वाटप करण्यात आले.
सद्भाव फाउंडेशन एक सामाजिक संस्था असून कर्जत व खालापूर ग्रामीण भागातील लोकांचा आर्थिक व सामाजिक विकास करण्यासाठी संस्था नेहमी प्रयत्न करत असते. ग्रामीण भागातील मुली शिक्षणाकरीता तीन ते चार किलोमीटर अंतरावरून चालत येत असतात, अशा गरजू मुलींना संस्थेतर्फे मोफत 77 सायकलींचे वाटप करण्यात आले. संस्थेच्या ट्रस्टी निता जोशी यांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाखाली संस्थेचे कर्मचारी प्रवीण पाटील, प्रगती पाटील, संतोष ढाकवळ, प्रकल्प अधिकारी सुनंदा लाड यांनी वाटप केले.







