सायकल वाटपातून शैक्षणिक प्रगती उंचावेल

नारंगीत सावित्रीच्या लेकींना सायकल
शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील यांचा उपक्रम
आ. जयंत पाटील यांच्या हस्ते वाटप
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
नारंगी परिसरातील विद्यार्थींनींना शैक्षणिक प्रगतीसाठी शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या वतीने शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते सायकलींचे वाटप करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी चित्रलेखा पाटील यांच्या उपक्रमाचे कौतुक करीत या उपक्रमामुळे या परिसराची शैक्षणिक प्रगती निश्‍चित उंचावेल असा विश्‍वास व्यक्त केला.

याप्रसंगी माजी मंत्री मीनाक्षी पाटील, माजी आमदार पंडित पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा गटनेते अ‍ॅड आस्वाद पाटील, जिल्हा परिषद सदस्य भावना पाटील, पंचायत समितीचे सभापती प्रमोद ठाकूर, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, मारुती पाटील, नारंगीच्या सरपंच स्मिता पाटील, उपसरपंच अमोल पाटील,नारंगी आस विद्यालयाचे हितचिंतक अशोक हिरामत, चित्रलेखा हिरामत, विकास काकवानी, लिना काकवानी, पेझारीचे उपसरपंच अ‍ॅड मनोज धुमाळ, गटविकास अधिकारी साळावकर, माजी सभापती कुंदा गावंड आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना आ. जयंत पाटील म्हणाले की, रायगडच्या जनतेचा शैक्षणिक उद्धार ना ना पाटील यांनी केला तीच परंपरा शेकापक्षाची पुढील पिढी कायम ठेवत आहे. महिलांना जास्तित जास्त शिकवण्याची गरज आहे. चित्रलेखा पाटील यांनी अतिशय स्तुत्य उपक्रम राबविला असून त्यासाठी काटेकोरपणे त्या मेहनत घेत कुठलाही राजकीय हस्तक्षेप न ठेवता काम करीत असल्याबाबत त्यांनी कौतुक केले. तर चित्रलेखा पाटील यांनी आपल्या मनोगतात
शाळेतील विद्यार्थींनींची गळती थांबविण्यासाठी सायकल वाटपातून मदत होईल असा विश्‍वास व्यक्त केला. संपूर्ण महाराष्ट्रभर एक लाख सायकलींचे वाटप करुन त्यामाध्यमातून शिक्षणात बदल घडविण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही त्या म्हणाल्या. सायकल वाटपातून शिक्षणाचा दर्जा वाढत असल्याचेही त्यांनी सांगितले.

चित्रलेखा हिरामत यांनी देखील चित्रलेखा पाटील यांच्या उपक्रमाचे कौतुक करताना सायकल वाटपातून शैक्षणिक प्रगती उंचावेलफ असा विश्‍वास व्यक्त केला.
निवेदन वेदांत कठंक यांनी केले. कार्यक्रमासाठी गाव अध्यक्ष प्रमोद पाटील, रांजणखार गाव अध्यक्ष संजय पाटील, नरेश म्हात्रे, सविता धुमाळ, शिल्पा म्हात्रे, राजेंद्र म्हात्रे, अनिल धुमाळ, राहूल पाटील, स्वप्निल म्हात्रे, माजी सरंपच विनोद पाटील, मंगेश म्हात्रे, वर्षा पाटील, अमृता म्हात्रे आदींनी परिश्रम घेतले.

Exit mobile version