शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील यांचा पुढाकार
। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
अलिबाग, मुरुड तालुक्यातील विद्यार्थिनी शिक्षणापासून वंचित राहू नये व त्यांची प्रगती व्हावी, याकरिता शेकाप महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या वतीने शेकापच्या माध्यमातून अलिबाग तालुक्यातील बेलोशी, महाजने, बापळे, दिवी-पारंगी या गावांतील विद्यार्थिनींना शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते सायकलींचे वाटप शुक्रवारी (दि. 3) करण्यात आले.
यावेळी आमदार जयंत पाटील यांच्यासह शेकाप महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील, तालुका चिटणीस अनिल पाटील, शेकाप पुरोगामी युवक संघटनेचे तालुका अध्यक्ष विक्रांत वार्डे, बेलोशी सरपंच कृष्णा भोपी, आंदोशी सरपंच सुधीर चेरकर, ज्येष्ठ कार्यकर्ते सदानंद थळे, प्रमोद भोपी, निलेश वारगे, महेंद्र विद्रे, सुभाष वाघळे, मोहन धुमाळ, युवराज पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.