रोजंदारी सफाई कर्मचार्‍यास नगराध्यक्षांकडून सायकल भेट

सायकल चोरी झालेल्या कर्मचार्‍याला दिला सुखद धक्का!

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रायगड डाक विभागात रोजंदारीवर काम करणारे सफाई कर्मचारी दत्ता पडवळ हे भादाणे येथील रहिवाशी दररोज सायकल ने घर ते ऑफिस असा 12 किलोमीटर जाऊन येऊन प्रवास करतात. घर चालवण्यासाठी प्रवास खर्च वाचवणे हे त्या मागील महत्वाचे कारण इतर वाहनाचे प्रवास भाडे परवड नसल्याने सायकल हा त्यांचा प्रवासाचा एकमेव सोबती पण अचानक त्याची सायकल अलिबाग डाक कार्यालयाच्या आवारातून चोरीला गेल्याने ते हतबल झाले. घरी दरोरोज चालत जाण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नोव्ह्ता, वेबफोटोमध्ये चोराची ओळख मिळत नसल्याने ही बाब बोलणेसे सबकुच होता है अशी जाहिरात असलेल्या फेसबुकवरून ही पोस्ट एका सहकार्‍याने टाकली. आणि चौकशीचे अनेक फोन त्यांना येऊ लागले. पण सर्वात सुखद धक्का दिला तो अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी फेसबुक वर टीव्हीट करत चोर मिळेल तेव्हा मिळेल पण त्यांना माझ्याकडून नवीन सायकल मात्र जरूर मिळेल. या त्यांच्या टीव्हीटवर हजारो शुभेच्छाचा पाऊस पडू लागला. जेव्हा प्रत्यक्ष त्याला नवीन सायकल भेट म्हणून मिळाली त्यावेळी त्या कर्मचार्‍याचा आनंद गगनात मावेनासा झाला.
प्रशांत नाईक यांच्या वाढदिवसाचे निमित साधत अलिबाग पोस्ट ऑफिस मध्ये डाक अधीक्षक श्री अविनाश पाखरे आणि हनुमत चीरमे सह्यक अधीक्षक यांच्या उपस्थित ही सायकल भेट देण्यात आली. सत्य आणि सचोटीच्या पाठीशी देव असतो ही सकल्पना देवदूत बनत नाईकसरांनी वास्तवात आणली अशी प्रतीक्रिया या कर्मचार्‍याने यावेळी व्यक्त केली.

Exit mobile version