अलिबाग नगरपरिषदेचा स्तुत्य उपक्रम
मान्यवरांची उपस्थिती
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग नगर परिषदेच्या यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत वर्षानिमित्त माझी वसुंधरा अभियानांतर्गत अलिबाग येथे सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले.
या निमित्ताने अलिबाग तहसिलदार मीनल दळवी यांनी प्रदूषणमुक्त स्वच्छ व सुंदर अलिबागचा संदेश नागरिकांना दिला व सायकल रॅलीस हिरवे निशाण दाखवून रॅलीची सुरुवात केली. यावेळी उपनगराध्यक्ष अॅड. मानसी म्हात्रे, सभापती अजय झुंजारराव, अनिल चोपडा, वृषाली ठोसर, अलिबाग लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष भगवान मालपाणी आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात माझी वसुंधरा या अभियानाची जनजागृती करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असून, त्याचाच भाग म्हणून आजची ही रॅली आयोजित करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
या उपक्रमात अलिबाग तहसीलदार कार्यालय व नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी पदाधिकारी तसेच सायकलस्वार मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. नागरिकांच्या उत्तम प्रतिसादात रॅलीची सांगता झाली.